उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नागपूर दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या उपस्थितीत नागपुरात निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नागपुरात चिंतन शिबिर घेतल्याने शिवसेनेच्यावतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या उपस्थितीत बुधवारी २४ सप्टेंबरला या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार होतं. पण हा निर्धार मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मराठवाड्यात पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी एकनाथ शिंदे जाणार आहेत. त्यामुळे त्यांचा नियोजित नागपूर दौरा मंगळवारी रद्द करण्यात आला आहे.
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच नागपूर दौरा करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत ऊर्जा निर्माण केली. राष्ट्रवादीच्या शिबिरात भाजपसोबतची युती अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यामुळे महायुतीत भागीदार असलेल्या शिवसेनेकडूनही नागपुरातच निर्धार मेळावा जाहीर करण्यात आला होता.
बुधवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा मेळावा होणार होता. यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे, विदर्भात संघटन बळकट करून गावागावापर्यंत पोहोचणे, विदर्भाच्या विकासासाठी आणि पक्षविस्तारासाठी रणनीती निश्चित करण्यात येणार होती. मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार होते. तसेच त्यानंतर पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांशी बैठकांचेही नियोजन करण्यात आले होते. पक्षाचे विदर्भातील सुमारे तीन ते साडेतीन हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार होते.
दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाने शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांचा नियोजित नागपूर दौरा रद्द झाल्याने हा मेळावाही रद्द करण्यात आला आहे. शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने मेळावा रद्द करण्यात आला असला तरी लवकरच याची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा