Koyna Dam Full : कोयना धरण १०० टक्के भरलं आहे. २० सप्टेंबरला हे धरण भरलं आहे. धरण भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरण गेल्या वर्षी २८ सप्टेंबर रोजी भरले होते. यंदाही धरण वेळेत भरल्याने मागणीप्रमाणे प्रकल्पातून वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. तसेच कोयना धरणावर अवलंबून असलेल्या टेंभू ताकारी व म्हैसाळ या जलसिंचन प्रकल्पांना दिलासा मिळाला आहे. कोयना जलाशयावर अवलंबून असलेल्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. कोयना धरण १९६३ मध्ये ते पूर्ण झाले. हे धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वाचे आहे.
Ladki Bahin Yojana E kyc: लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी काय करावं लागेल? मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली प्रक्रिया…
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे. कोयना धरणाच्या जलाशयावर कोकणातील चिपळूण तालुक्याजवळचा भाग व पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे लक्ष लागलेले असते. यावर्षी हे धरण वेळेतच पूर्ण क्षमतेने भरले आहे, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. गेल्या साठ वर्षांत केवळ चार वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते.
Nagpur Rain : अतिवृष्टीने शेकडो घरांचे नुकसान, 8 हजारहून घरं अंशत:, तर 132 घरं पूर्ण उद्ध्वस्त; नागपुरातील हृदयद्रावक चित्र
सतर्कतेचा इशारा
कोयना धरण १०० टक्के भरल्यानंतर, धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कोयना धरणाचे चार वक्री दरवाजे एक फूट उघडून सहा हजार ४०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण आठ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरण परिसरात तुफान पाऊस, शिंदेंचा ताफा थांबला, अखेर बोटीने दरे गावापर्यंत प्रवास!
सध्या कोयना धरणात एकूण आवक – १६४.३३ टीएमसी
पूर नियंत्रण व पूर्वेकडील वीजनिर्मिती – ६६.४३ टीएमसी
पश्चिमेकडील पाणी वापर – १३.०५ टीएमसी

