Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी येथे सहदेव सातभाई यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी वाल्मिक कराड समर्थकांच्या रघुनाथ फड टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. सहा आरोपींपैकी काही जणांवरील आरोप सिद्ध न झाल्याने मकोका हटवण्यात आला आहे. रघुनाथ फड नावाचा आरोपी अजूनही तुरुंगात आहे, त्याच्यावर मकोका कायम आहे. न्यायालयाने इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वृत्तानुसार, सहदेव सातभाई यांच्या तक्रारीनुसार 18 ऑक्टोबर 2023 ला दुपारी 04.30 वाजता तडोळी येथुन परळी वैजनाथ येथे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे काम करण्यासाठी व ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी घरातून 02 लाख 70 हजार रुपये घेऊन त्याच्या स्वतःच्या मोटारसायकलवर परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून सात बारा आणण्यासाठी जलालपुर रोडकडे तलाठी कार्यालयाकडे निघाला होता. जलालपूर रोडचे कमानीजवळ असताना मोटार सायकल समोर पांढऱ्या रंगाची स्कॉर्पीओ आडवी लावून आरोपी रघुनाथ फड व धनराज ऊर्फ राजेभाऊ फड व इतर सात ते आठ जण काठ्या व लोखंडी रॉड घेवून खाली उतरले. रघुच्या हातात लोखंडी रॉड आणि इतर गुंडांच्या हातात वेळुच्या काठ्या होत्या. त्यावेळी रघुने भडवा लई माजला म्हणत वार करण्यास सांगितले. सहदेवला तोंडावर पालथे खाली पाडून त्याच्या पाठीवर सपासप वार करण्यात आले. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
Beed Crime News : ‘आज माझा वाढदिवस, मुळशी पॅटर्न केल्याशिवाय सोडणार नाही…,’ तरुण व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, थरार सीसीटिव्हीत कैद
एवढ्यावरच न थांबता रघुनाथने त्याच्याकडील लोखंडी रॉडने सहदेवला डोक्यावर वार केला. सहदेवने तो वार चुकवला त्यामुळे त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली व उजव्या खुब्यावर मार जबर मार लागला. लोखंडी रॉडचा वार चुकला म्हणून पुन्हा फरशी उचलून ती सहदेवच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला, पण यामधूनही सहदेव बचावला.पण फरशी दोन्ही पायाचे गुडघ्यावर मारल्याने तसेच पुन्हा लोखंडी रॉडने पायाच्या नळीवर मारहाण केल्याने सहदेव गंभीर जखमी झाला. त्यामुळे फिर्यादीचा डावा पाय फ्रैक्चर झाला होता. क्रूरतेचा कळस म्हणदे आरोपी रघुनाथ सहदेवच्या तोंडावर बसला. त्यामुळे त्याच्या जीभेला जखम झाली. त्याच्या पँटमधली 2 लाख 70 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. एवढं सगळं घडूनही निघुन जात असताना रघुनाथने सहदेवला तु आता वाचलास, परंतु यानंतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली होती, असे तक्रारीत नमूद होते.
सहदेव फडला महादेव उध्दवराव गित्ते याने परळी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले. फडवर त्याठिकाणी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी फडचा भाऊ संपत सातभाई याच्यासह सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे पाठवले असल्याचेही सांगण्यात आले होते. यातील आरोपींनी आपसात संगनमत करुन फडला जीवे मारण्याचा क्रूर कृत्य केले.
मात्र हे प्रकरण कोर्टात दाखल केल्या कारणावरून कोर्टाने आदेश देत गोट्या गित्ते व बाकी आरोपींना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देत एफआयआर दाखल केला होता.
या दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सदरचा गुन्हा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 अन्वय अधिकार प्रधान केलेल्या मा.विशेष न्यायाधीश महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण न्यायालय, अंबाजोगाई व मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय परळी यांचे स्थळ सिमेत व पोलीस ठाणे परळी शहर चे कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज चौक जवळील जलालपुर रोडवरील कमानीजवळ परळी वै. जि. बीड येथे दिनांक 18/10/2023 रोजी 17.00 वा ते 17.15 वा चे सुमारास गुन्हा घडलेला आहे असे अमूद करण्यात आले होते.
मात्र पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणाच्या अनुषंगाने सहा आरोपींना ताब्यात घेत सखोल चौकशी केली त्यांच्यावर मकोका अंतर्गत कलम देखील लावण्यात आले. शेवटी ज्या आरोपींवर फडने आरोप केले होते, त्या आरोपीला आता दोषारोप पत्रात मात्र स्थान दिले नाही. यामध्ये वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता म्हणून गोट्या गित्तेचा उल्लेख वारंवार करण्यात आला होता.
परळी तालुक्यातील नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या गोट्या गित्ते वर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे 10 ते 15 गंभीर गुन्हे नोंद असल्याचे आरोप केले गेले होते, तो अद्याप फरार आहे. त्या गोट्या गित्तेला पोलिस अद्याप पकडू शकली नाही.. त्या गोट्या गित्ते ने अटकपूर्व जमीन मंजूर करून घेतली होती.. तर उर्वरित तिघांच्या जमीन देखील मा न्यायालयाने मंजूर केल्या गोट्या गिते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गिते या पाच जणांवरील मकोका रद्द झाला आहे.
मात्र रघुनाथ रामराव फड या आरोपींकडे जामीन करण्यासाठी पैसे नसल्याने तो अद्याप बीड येथील कारागृहात आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल असून त्याच्यावर मकोक्का अंतर्गत गुहा कायम असल्याचे देखील दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले आहे. तर धनराज उर्फ राजेश श्रीरंग फड यांच्यावर अ समरी नुसार दोषारोप पत्रात नाव आहे.
संबंधित पोलिसांनी या सर्व आरोपींची जामीन रद्द करण्यात यावी या अश्याचा अर्ज देखील मा न्यायालयात दाखल केला होता मात्र तो अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा
