Koyna Dam : कोयना धरणातून विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज २० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ३:०० वा. कोयना धरणाचे दोन वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दोन वक्र दरवाजे १ फूट उघडे असून त्याद्वारे ३,२०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ५,३०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
