Chhatrapati Sambhajinagar Youth Commits Suicide in Front Railway Station : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डेमो पॅसेंजरसमोर उडी घेऊन एका 29 वर्षीय तरुणाने उडी घेत आतामहत्या केली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अनिल बाबुराव पवार (वय 29, रा. लाख खंडाळा, ता. वैजापूर) असं धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पवार हा वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा येथील रहिवासी आहे. अनिल हा परसोडा रेल्वे स्थानकाजवळ होता. डेमो पॅसेंजर असलेल्या नगरसोल जालना या धावत्या रेल्वेसमोर अनिल अचानक उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील शंकर कवडे यांनी तात्काळ घटनेची माहिती रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांना दिली.
अरे देवा! काय ही वेळ, फडणवीसांचे पोस्टर नको ‘त्या’ ठिकाणी
पाऊस सुरू असताना रेल्वे पोलीस व रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानी हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी प्रचंड चिखल असताना देखील पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. यावेळी पोलिस विभागाचे पोलिस नाईक बडे, पोलिस कॉन्स्टेबल धायडे, प्रदीप खंडागळे, गोसावी यांनी प्रचंड मेहनत घेतली. दरम्यान, याप्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अनिलने आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे अनिल याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Washim News : आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत
दुसऱ्या दिवशी रामाचा शोध लागला
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. देऊळगाव जहागीर येथील रामा संभाजी गलांडे (वय 14) हा शाळकरी मुलगा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गावाजवळील नदीकाठी गेला असता दुर्दैवाने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामा गलांडे हा काल गुरुवारी रोजी दुपारच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत गावालगतच्या नदीवर गेला होता. पाण्याचा आनंद घेत असताना तो अचानक नदीवरील बंधाऱ्याजवळ खोल पाण्यात पडला आणि वाहून गेला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी तातडीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला.

