Jalgaon 15 Year Old Girl Drowns in River : राज्यात सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी देखील झाली आहे. अशीच अतिवृ्ष्टी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात झाली आहे. मात्र, यावेळी नदीच्या पाण्यात एक 15 वर्षीय मुलगी वाहून गेली आहे.
नेमकं काय घडलं?
पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक गावात आज शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास निकिता भालेराव (वय 15) आणि तिची मामी सरला खरे (वय 35) या दोघी शेतातून परत येत होत्या. हिवरानदी ओलांडत असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं दोघी वाहू लागल्या. परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत सरला खरे यांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र निकिता पुराच्या पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, तीन तासांपासून निकिताचा शोध सुरू आहे.
रेल्वेस्थानकाजवळ उभा होता, अचानक डेमो पॅसेंजरसमोर उडी घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं; छ.संभाजीनगरमध्ये हळहळ
नातीच्या दुःखाने आजोबांचा मृत्यू
एकीकडे निकिताचा शोध सुरू असतानाच दुसरीकडे ही बातमी निकिताच्या 65 वर्षीय आजोबा श्यामराव खरे यांना कळली. नात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचा मोठा धक्का त्यांना बसला. या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे एकाच कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळलं असून, वडगाव टेक गावात शोकाकूल वातावरण आहे.
Hingoli News : मित्रांसोबत पोहायला जाणं पडलं महागात, खोल पाण्यात पडला अन्…; दुसऱ्या दिवशी रामाचा शोध लागला
घटनेच्या दोन तासानंतर प्रशासन मदतीला
दरम्यान, दुपारपर्यंत घटनास्थळी दोन तासानंतरही कोणतीही शासकीय मदत पोहोचलेली नव्हती. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसामुळे नदीला पूर आलेला असून अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन सज्ज नसल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेची माहिती निकिताच्या आजोबांना कळताच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडल्यामुळे ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. ग्रामस्थ मिळेल त्या साधनांचा वापर करून वाहून गेलेल्या निकिताचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत.

