• Mon. Jul 6th, 2026

    मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2025
    मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद




    परभणी दि. १७ (जिमाका) : परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय-बाईकचे उद्घाटन आज पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

    यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

    पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, परभणी पोलीस विभागाचे आय बाईकसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ संकल्पनेतून या बाईक तयार केल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी या साधनांचा मोठा उपयोग होईल. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांच्या संकल्पनेचे विशेष कौतुक करून मुख्यमंत्री यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात हा उपक्रम नाविन्यपूर्ण उदाहरण म्हणून सादर करण्याची सूचना केली.

    पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रास्ताविकात पोलीस विभाग हा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव सतर्क असल्याचे सांगून फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे महत्त्व स्पष्ट करत या साधनांमुळे तपासाला गती मिळेल, असे सांगितले.

    यावेळी पालकमंत्री यांनी आय बाईकला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. तत्पूर्वी फॉरेन्सिक व्हॅन व आय बाइकचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

    ०००







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed