• Tue. Jul 7th, 2026

    नाशिकच्या अभिनव भारत मंदिरास मंत्री आशिष शेलार यांची भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 6, 2026
    नाशिकच्या अभिनव भारत मंदिरास मंत्री आशिष शेलार यांची भेट – महासंवाद

    नाशिक, दि. ६ जुलै (जिमाका वृत्तसेवा): राज्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दुपारी अभिनव भारत मंदिरास भेट देत सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली.

    यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अभिजीत शेलार, उपअभियंता सचिन शेळके, वास्तू विशारद निनाद बोथरा आदी उपस्थित होते.

    आमदार श्रीमती फरांदे यांनी अभिनव भारत मंदिराच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. मंत्री श्री. शेलार यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला.

    ०००००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed