Konkan Railway New App : कोकण रेल्वेकडून प्रवाशांसाठी ‘केआर मिरर’ नावाचं ॲप सुरू करण्यात आलं आहे. यामुळे कोकणातील गाड्यांची सद्यस्थिती एका क्लिकवर समजण्यास मदत होईल. चार भाषांमध्ये असलेल्या या ॲपचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे.
प्रवासाची माहिती एका क्लिकवर मिळणार
‘केआर मिरर’ मोबाइल ॲपमध्ये प्रवाशांना आवश्यक प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. बहुभाषिक ॲप असल्याने याद्वारे प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम राबवणे सहज शक्य होणार आहे. कोकणातील विविध पर्यटनस्थळे आणि ठिकाणे यांची माहिती यामध्ये असल्याने प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे. ॲपची जोडणी कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला देण्यात आली आहे. यामुळे ॲपमधून थेट संकेतस्थळावर पोहोचणे शक्य आहे.
दिवाळीत प्रवाशांना रेल्वे तिकिटे मिळेना; पुणे आणि मुंबईहून नागपूरला जाणाऱ्यांना अडचणी
काय-काय सुविधा असणार?
सद्यस्थिती आणि तपशीलवार रेल्वे वेळापत्रक, स्थानकासह रेल्वेगाड्यांच्या केटरिंग सेवांची माहिती, महिला समर्पित सुविधा आणि हेल्पलाइन, प्रवाशांसाठीच्या हेल्पलाइन अशा सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत. कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि कोकण रेल्वेने केलेली कामे यांचा उल्लेख आहे. केंद्रीय माहिती सूचना प्रणाली केंद्रातून करण्यात येणाऱ्या उद्घोषणा आणि सूचना ॲपमध्ये झळकणार आहेत.आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, यासह आणि त्वरित-प्रवेश हेल्पलाइन अशी मोबाइल ॲपची निवडक वैशिष्ट्ये आहेत, असे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Bridge collapsed due to rain : कोकण-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा वळण मार्गावरील पूल वाहून गेला
दिवाळीदरम्यान कोकणात जाण्यासाठी विशेष सेवा
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी जादा, स्पेशल गाड्याही चालवण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवानंतर दसरा, दिवाळीत, डिसेंबरमध्येही कोकणात जाण्यासाठी मोठी गर्दी असते. अशा सुट्ट्यांच्या काळात आता रेल्वेकडून खास लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक विशेष सेवा सुरू केली जात आहे. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या काळात ही विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा देण्यात येणार आहे. या साप्ताहिक रेल्वेच्या आठ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

