Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, जळगावमधी भुसावळमध्ये पुन्हा एका हत्येची घटना घडलीय. कौटुंबिक वादातून मामसासऱ्यावरच जावयाने हल्ला केल्यानं त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कौटूंबिक वादातून नात्याने मामसासरा असलेल्या 40 वर्षीय व्यक्तीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. तर वादादरम्यान झालेल्या तुंबळ हाणामारीत व चाकू हल्ल्यात संशयीत जावयासह सासरा देखील जखमी झाला. ही धक्कादायक घटना खडका रोडवरील अयान कॉलनीत काल शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. हत्येच्या घटनेनं शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शेख समद शेख ईस्माइल (वय 40, रा. कंडारी) असं मयताचं नाव आहे.
आरक्षणाच्या लढाईत विचित्र प्रकार: मराठा आणि ओबीसी पालकांनी परस्परांच्या शाळांमधून मुलांना बाहेर काढलं!
नेमकं काय घडलं भुसावळ शहरात ?
प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून दोन परिवारात वाद मिटवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी सासरा, जावई आणि नातेवाईक खडका रोडवरील अयान कॉलनीतील जावयाच्या घरात जमले. मात्र, शाब्दिक वाद गुद्द्यांवर पोहोचला व याचवेळी चाकू तसेच फरशीचा वापर झाल्याने शेख समद शेख ईस्माइल यांच्या छातीवर चाकूचा घाव वर्मी बसला. तसेच जावई शेख सुभान शेख भिकन व सासरा शेख जमील शेख शकील यांना देखील मारहाण झाल्याने तसेच चाकू लागल्याने ते जखमी झाले. दोघांवर गोदावरी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Ratnagiri Crime : गर्लफ्रेंडला संपवून दरीत टाकलं, नंतर आणखी दोघांचा जीव घेतला; मुलाचं दुष्कृत्य लपवण्याचं बापाचं कारस्थान अन्…
पोलिस यंत्रणेची धाव
भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारार्थ हलवले. यावेळी शेख समद शेख ईस्माइल यांना बेशुद्धावस्थेत गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत असल्याचं सांगितल्यानं जळगाव जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.

