Shivsena UBT on President Election : उपराष्ट्रपती निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या पक्षांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तर पक्षांवर कारवाईची मोठी मागणी केली आहे. ‘सामना’च्या संपादकीयमध्येही यावर भाष्य करण्यात आले आहे.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांबाबतीत मतदान प्रक्रियेबाबत महत्त्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, उपराष्ट्रपती निवडणुकीत झालेल्या मतदानातून अनुपस्थित राहण्याचा अधिकार कोणालाही असू नये. मतदान सक्तीचे करण्यात यावे. सर्वोच्च घटनात्मक पदांसाठी मतदानापासून दूर राहणाऱ्या पक्षांची नोंदणी रद्द केली जावी, अशी मोठी मागणी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याच्या तयारीत? जिल्हा प्रमुखांच्या बैठकीतली Inside Story
उद्धव ठाकरेंच्या आरोप केला की, भारत राष्ट्र समिती (BRS), बीजेडी तसेच काही अन्य पक्ष मतदानात सहभागी झाले नाहीत. ते नेहमीप्रमाण केंद्रीय तपास संस्थांना घाबरले आहेत. त्यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधींनी मतदानात अनुपस्थित राहणे, हे असंवैधानिक आहे. लोकशाहीच्या या प्रक्रियेबाबत गंभीरता न दाखवणाऱ्या पक्षांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीयात देखील या मुद्यावर कठोर शब्दांत भाष्य करण्यात आले. त्यात स्पष्ट म्हटले की, मतदानापासून दूर राहणे असंवैधानिक आहे. तसेच पक्षाकडून असेही मतदानापासून दूर राहणाऱ्या पक्षावर घोडेबाजारात सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
यामुळे उद्धव ठाकरे गटाने मतदान प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याचा सूर लावला आहे. या मुद्द्यावरून पुढील काही दिवसांमध्ये राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.

