Indapur Reel Star Pratik Shinde Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर काल गुरुवारी एक भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पण यात रिल स्टार प्रतिक शिंदेच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघाता एकाचवेळी तीन वाहनांचं नुकसान झालं आहे.
प्रतीक राम शिंदे (वय 24, भादलवाडी, ता.इंदापूर) असं अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, सोलापूर) हे आपल्या ह्यूदांई क्रेटा कार क्रमांक (एम.एच. 45 ए.यु. 9779) या गाडीतून प्रवास करत असताना काळ्या रंगाच्या टोयोटा फॉर्च्युनर क्रमांक (एम.एच. 42 बी.एस. 0111) हिने पाठीमागून बाजूने जोरात धडक दिली. धडक एवढी जोरात होती की, क्रेटा कारला पुढे असलेल्या मारुती व्हॅगनरवर जाऊन जोरात आदळली. यामुळे एका अपघातात तीन वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
खासदार प्रणिती शिंदे आयुक्तांवर भडकल्या, म्हणाल्या, ‘मला आत्ताच्या आता…’
अपघातग्रस्त गाडी रील स्टारची
मोठा गाजावाजा करून रिल स्टार प्रतीक शिंदे याने महिन्याभरापूर्वी फॉर्च्युनर गाडी घेतली होती. मात्र, या गाडीचा अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना शिंदेच्या गाडीने पुढे निघालेल्या क्रेटा कारला पाठीमागून धडक दिली. प्रतीक हा स्वतः गाडी चालवत होता. धडकेचा जोर एवढा होता की, क्रेटा कार पुढे असलेल्या मारुती व्हॅगनर आदळली. काही क्षणात तीनही गाड्या एकमेकांना धडकून लाखो रुपयांचं नुकसान झालं. दरम्यान, लोकप्रियतेच्या नादात फिल्मी स्टाईलने गाडी चालवणाऱ्यांवर आळा बसलाच पाहिजे, अशी चर्चा परिसरात रंगताना दिसत आहे.
Govind Barge : ‘मी तिला बायकोपेक्षा जास्त जीव लावला, पण तिने मला अल्टीमेटम दिला’, गोविंद बर्गे प्रकरणात पूजाची ‘डिमांड स्टोरी’
निवृत्त डॉक्टरचा करुण अंत
संभाजीनगरमध्ये देखील बुधवारी एक भीषण अपघात झाला. नातेवाईकांकडे पितृपक्षाचा कार्यक्रम असल्यानं जेवण करून घराकडे परतत असताना कामगारांची ने-आण करणाऱ्या भरधाव बसने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात रस्त्यावरून दूरवर फेकल्या गेल्यानं निवृत्त डॉक्टरचा (Doctor) जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सिडको (CIDCO) पोलिस ठाण्याजवळील जिगीषा शाळेसमोर घडली.

