Solapur Upsarpanch Death Case : वैराग पोलिसांनी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा गायकवाडला अटक केले आहे. गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केल्याने याप्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गोविंदच्या कारचा दरवाजा लॉक होता. त्याच्या गाडीची बॅटरी उतरली होती. हे कसं शक्य आहे? असा सवाल त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
गोविंद बर्गे यांनी पूजावर लाखो रुपये उधळले
लुखमसला (ता. गेवराई, बीड) येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी प्लॉटिंग व्यवसायातून बक्कळ पैसा कमविला होता. गोविंद बर्गे हे धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात अडकले. पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सासुरे गावची होती. धाराशिव जिल्ह्यात एका कला केंद्रात नर्तिकेचे काम करत होती. गोविंद बर्गे यांचं लग्न झालेलं असूनही पूजाच्या प्रेमात पडले आणि बर्गे यांनी पूजा गायकवाडवर पाण्यासारखा पैसा उधळला. मोबाइल, मोटारसायकल, प्लॉट, सोन्याचे दागिने अशा अनेक भेटवस्तूंसोबतच लाखो रुपयेही तिच्यावर खर्च केले.
Pooja Gaikwad पोलीस कोठडीत, पण रील्सवर लाईक्सचा पाऊस, दोन दिवसात इन्स्टा फॉलोअर्स 45 पट वाढले, कारण…
गेवराईतील घर पूजाच्या मनात होते
पूजा गायकवाडने वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टींची मागणी करू लागली होती. गोविंद बर्गे यांनी गेवराईत आलिशान घर बांधले होते. पूजा गायकवाड हिच्या मनात गेवराई मधील घर भरले होते. गेवराईमधील ते घर माझ्या नावावर करा, माझा वाढदिवस जवळ आहे, त्यावेळी ते नावावर केले नाही, तर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशा धमक्या ती देऊ लागली, असा आरोप बर्गेंच्या नातेवाइकांनी केला आहे. या सततच्या दबावामुळे मानसिक खचलेले गोविंद बर्गे यांनी मंगळवारी बार्शीत येऊन टोकाचा पाऊल उचलले आणि स्वतःच्या आयुष्याच शेवट करून घेतले आहे.

