• Mon. Jun 8th, 2026
    Pune Crime : पुण्यात नात्याला काळिमा फासणारी घटना, नराधम बापाकडून पोटच्या मुलीवर अत्याचार; असा समोर आला संतापजनक प्रकार

    Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी अत्याचार केला असून गनिमीकावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजित दराडे, पुणे : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कमी होण्यास नाव घेत नाही. एकीकडे टोळी युद्धाने पुणे शहर हादरलं असताना पुण्यातील कोंढवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यात वडिलांनीच स्वत:च्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे.

    वडिलांकडून मुलीवर अत्याचार

    पुण्यातील कोंढव्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार महिने अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या काकडीवस्ती येथे एक नराधम बाप आपल्या 14 वर्षे अल्पवयीन मुलीवर चार महिन्यांपासून अत्याचार करत असल्याची माहिती गनिमीकावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होता. ही माहिती मिळाल्यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने या नराधमाला पकडले. त्यानंतर बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले.
    Maharashtra TimesPune Crime : शाळकरी मुलाने मुलीला स्कूटीवर घरी सोडलं, कुटुंबियांचा राग अनावर, विद्यार्थ्याला मारहाण करत गोळीबार

    मुलीची वैद्यकीय चाचणी करुन समुपदेशन सुरू

    स्थानिक नागरिकांनी या नराधम पित्याला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तिचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी तिच्यासाठी समुपदेशनाची सोय करण्यात आली आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून टोळी युद्धाने पुणे हादरलं असून दुसरीकडे अशा पद्धतीने नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने शहरात रोष, संताप व्यक्त होत आहे.

    Pune crime news | कोंढवा परिसरात धक्कादायक घटना; डिलिव्हरी बॉयकडून दिवसाढवळ्या तरुणीवर अत्याचार

    पुणयात गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ

    पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ सुद्धा पुण्यातच रोवली. मात्र आता पुण्यात या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पुण्यात मुलींसाठी संरक्षित वातावरण तयार करण्यासाठी पुणे पोलीस उभे असताना दुसरीकडे घरामध्येच अशा पद्धतीने नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा