Pune News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. टोळीयुद्धात झालेल्या २० वर्षीय मुलाच्या हत्येनंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आमदाराच्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं प्रकरण काय ते समजून घ्या.
गंगाधाम चौकाकडून लुल्लानगर चौकाकडे जाताना एक पावभाजीचे प्रसिद्ध हॉटेल असून, ते वानवडी पोलिसांच्या हद्दीत आहे. या हॉटेलमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री एक आमदार कार्यकर्त्यांसह जेवणासाठी आले होते. त्या वेळी हॉटेलमध्ये आमदाराचे सुरक्षारक्षक आणि तेथे उपस्थित काही जणांशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्या वेळी कुख्यात सट्टेबाजाने आमदाराच्या पोलिस सुरक्षारक्षकाला मारहाण केली. गोंधळात हॉटेलमध्ये तोडफोड झाली. हॉटेलमधील तोडफोड आणि पोलिस सुरक्षारक्षकाला मारहाण ही माहिती स्थानिक पोलिसांना ‘नेटके’ पणाने देण्यात आली. मात्र, त्यावर तीन दिवस उटल्यानंतरही गुन्हा दाखल झाला नाही किंवा कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
पुणे गँगवॉर! ‘मी माझ्याच नातवाला का संपवू?’; बंडू आंदेकरचा कोर्टात सवाल, वाचा A टू Z युक्तिवाद
दरम्यान, या प्रकरणी परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘आमदार संबंधित हॉटेलमध्ये जेवायला आले होते. तेथे त्यांच्या सुरक्षारक्षकांचा काहींशी वाद झाला. त्या वेळी ग्लास पडून फुटले,’ असे त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले, तसेच या प्रकरणी तक्रार आल्यास कारवाई करू, असेही सांगितले.
Pune News : किराणा भरण्यावरून पती-पत्नीत कडाक्याचं भांडण, थेट कोर्टाची पायरी चढली; कोर्टाचा एक आदेश अन्…
पुण्यात दहशतीचं वातावरण
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेदगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता ५ सप्टेंबरला नाना पेठ येथे आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली होती. टोळीयुद्धामधूनच हा मर्डर झाल्याचं समोर आलं आहे. आता आरोपींना अटक करण्यात आली असून काही आरोपी फरार आहेत. मात्र त्यांनाही लवकरच अटक होईल. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या या मर्डरने पुणे शहर हादरून गेलं आहे.

