Ratnagiri Youth Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तो शेजारी जेवायला गेला होता, त्यानंतर तो अचानक घरी आला आणि पुन्हा घरातून बाहेर गेला. त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत काहीही माहिती नाही.
गणपती विसर्जनाच्या जेवणाला गेला होता
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश पांचाळ हा तरुण हा त्याच्या घराचे शेजारी राहणारे बाळकृष्ण करंबेळे यांचे घरी गणपती विसर्जन निमित्ताने जेवणाचा कार्यक्रम होता, तेथे जेवायला गेला होता. तेथूनच तो अचानक घरी निघुन घरी आला. त्यानंतर तो घरातून परत बाहेर निघाला, तेव्हा त्याच्या आई वैशालीने त्याला कुठे जातोस असे विचारलं. तेव्हा त्याने मी जरा बाहेर जावुन येतो, असे सांगितले व तो घरातून निघुन गेला.मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही, त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या वाडीतील लोकांनी शोधाशोध सुरू केली. शोधा शोध सुरू असतानाच घराचे मागील बाजूस परसवात एका आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावलेलं आढळून आलं. त्याला गळफास घेतलेलं पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. सगळ्यांनी मिळून त्याला तात्काळ खाली उतरवून खाजगी गाडीने उपचारासाठी ग्रामिण रुग्णलय लांजा येथे दाखल केले. मात्र, लांजा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
अविनाश पांचाळ हा फर्निचर व स्लाइडिंगची काम करायचा अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. ही सगळी दुर्दैवी घटना 8 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या सगळ्या घटनेची नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे. दरम्यान, ही आत्महत्या घरातील किरकोळ वादातून झाली असण्याची प्राथमिक शक्यता लांजा पोलिसांनी वर्तवली आहे. अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.

