Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आणखी विलंब होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन होईल, अशी आशा होती. पण आता पुन्हा काही तास विसर्जन रखण्याची चिन्हं आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : लालबागच्या राजाचं विसर्जन गेल्या 9 तासांपासून रखडलं आहे. हे विसर्जन आणखी काही तास रखडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी याबाबत माहिती दिली आहे. लालबागच्या राजाची मूर्ती आज सकाळपासून तराफ्यावर बसवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पण समुद्राला मोठी भरती आलेली होती. त्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं. मंडळाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज दिवसभर मूर्ती तराफ्यावर चढवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पण त्यांना काही केल्या यश येत नव्हतं. अखेर आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पाणी ओसरलं आणि मूर्ती तराफ्यावर बसवण्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांना यश आलं. पण तरीही लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणखी काही तास थांबावं लागणार असल्याची माहिती मिळत आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन आता रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास होणार असल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.
“ही भरती आहे, कोळी बांधव अनेक वर्षांपासून आमच्यासोबत आहेत. मी त्यांच्याशी देखील संवाद साधला. त्यांनी मला सांगितलं की, रात्री साडे दहा ते अकरा वाजता हा तराफा फ्लोट होईल. त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात विसर्जनासाठी मार्गक्रमण करेल”, अशी महत्त्वाची माहिती सुधीर साळवी यांनी दिली.
“आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे. कधी आम्ही नियोजन करतो आणि ते होत नाही, असं होत नाही. त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त केली. लालबागच्या राजाचं विसर्जन अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्ही करत आलेलो आहोत. तसंच विसर्जन आम्ही आतादेखील थोडं उशिरा का होईना करणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि नवीन पद्धतीचा तराफा बनवण्यात आला आहे. नवीन पद्धतीची गाडी बनवली आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आता विसर्जन मिरवणूक आपल्याला पाहायला मिळेल”, असं सुधीर साळवी म्हणाले.
“लालबागच्या राजाच्या विसर्जनात तांत्रिक अडचण अशी कोणतीच नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तुफान पाऊस पडतोय. त्यामुळे भरती लवकर आली. आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक पोहोचेपर्यंत भरतीची वेळ जुळली नाही. त्यामुळे आम्ही मंडळाने निर्णय घेतला की थांबायला पाहिजे. कारण त्यावेळेला ते आव्हानात्मक होतं. समुद्राची भौगोलिक स्थिती पाहिल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला”, अशी माहितीदेखील सुधीर साळवी यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा