Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास त्यांचा आक्षेप आहे. सरकारने यावर स्पष्टता आणावी, ओबीसी समाजाने काळजी करू नये, असे ते म्हणाले. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे बोलत होते. तसेच, त्यांनी मनोज जरांगे यांनी धनगर समाजाबद्दल वापरलेल्या अपशब्दांचा निषेध केला.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३३ व्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भटक्या जमातींचे योगदान आणि इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राज्यभरातील समाज बांधव भिवडीत दाखल झाले. आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी उपस्थित राहून ही भूमी ऊर्जा देणारी असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, “राजे उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्यासाठी जीव धोक्यात घालून लढा दिला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे येऊन अभिवादन केले.
Pune Gangwar : पुणे हत्या प्रकरण: लेकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी नातवाला संपवलं; गँगस्टर बंडू अण्णाच्या रडारवर आणखी कोण कोण?
धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा पडळकर यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “धनगर समाजाकडे सुभेदार मल्हार होळकर यांची तलवार, अहिल्यादेवींचा भासळा आणि पिंड, तसेच यशवंतराव होळकर यांच्या तोफा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची कुऱ्हाड आणि बंदूक आहे. धनगरांना कुठे काय वापरायचे हे चांगलेच कळते.” जरांगे यांनी याचा योग्य अर्थ समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भिवडीतील या जयंती सोहळ्याला शासकीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले.
Pune News : मुलाला आणायला निघालेल्या बापावर काळाचा घाला, भीषण अपघातात मन हेलावणारा अंत
धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा पडळकर यांनी तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “धनगर समाजाकडे सुभेदार मल्हार होळकर यांची तलवार, अहिल्यादेवींचा भासळा आणि पिंड, तसेच यशवंतराव होळकर यांच्या तोफा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची कुऱ्हाड व बंदूक आहे. धनगरांना कुठे काय वापरायचे हे चांगलेच कळते.” जरांगे यांनी याचा योग्य अर्थ समजून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

