Beed NCP Worker Abuse Female Teacher : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशीच एक संतापजनक घटना बीडमध्ये पुन्हा उघडकीस आली आहे. येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या माजी जिल्हा परिषद असलेल्या सदस्यावर महिला शिक्षिकेवर बलात्कार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे याच्यावर महिला शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात नारायण शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, शिंदे याने 2006 पासून ते 2022 पर्यंत लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. याचबरोबर ‘घर घेऊन देतो’, म्हणत तब्बल 1 कोटी 10 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.
‘तुझी एवढी हिंमत?’, अजित पवार महिला IPS अधिकाऱ्यावर संतापले, दोघांमध्ये संभाषण काय?
महिला शिक्षिकेनं या त्रासाला कंटाळून बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याच तक्रारीवरुन नारायण शिंदे याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (2) (एन), 406, 506 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असल्याचं सांगण्यात येत आहे. आरोपी नारायण शिंदे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, घटनेचा तपास बीड येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे संबंधित अधिकारी करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोठी बातमी! नोकरदारांचे कामाचे तास वाढले? महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांकडून मोठं स्पष्टीकरण
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीची मालिका सुरुच
बीड जिल्ह्यातील पोलिस प्रशासन जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, इथे होत असलेले विविध प्रकारचे गुन्हे यामुळे पोलिस प्रशासनाची वचक गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर राहिली नाही का? असा सवाल देखील या निमित्ताने नागरिकांतून उपस्थित होत असल्याचं समोर येत आहे.

