• Fri. Jun 12th, 2026
    मीरा भाईंदरमध्ये टारझन ऑर्केस्ट्रा बारमध्ये पोलिसांची धाड, अनेक मुलींना गुप्त कपाटातून बाहेर काढलं

    मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये धाड टाकली. यावेळी काही अवैध प्रकार घडत असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे पोलिसांनी या कारवाईत चक्क 5 मुलींची गुप्त कपाटातून सुटका केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काशिमीरा पोलिसांनी टारझन ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडलं. विशेष म्हणजे या कारवाईत 5 मुली या चक्क एका कपाटीत सापडल्या. त्यामुळे पोलीस देखील चक्रावले. या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा काही दिवसांपूर्वी अशाप्रकारची कारवाई करण्यात आली आहे. मीरा-भाईंदरमध्ये अशाप्रकारे अवैध धंदे सुरु असल्याची सातत्याने चर्चा होती. पोलीस आयुक्त निकेत कौशिक नियुक्त झाल्याापासून त्यांनी या अवैध धंद्यांच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. टारझर ऑर्केस्ट्रा बारमध्ये अशीच धडक कारवाई करण्यात आली.

    पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून टारझर आर्केस्ट्रा बारमध्ये अवैध आणि अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. यावेळी पोलिसांच्या समोर धक्कादायक माहिती समोर आली. विशेष म्हणजे बारमध्ये 5 मुलींना थेट कपाटीत लपवलेलं होतं. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं.

    पोलिसांनी या कारवाईत तब्बल 21 जणांना अटक केली आहे. यामध्ये 12 मुलींची सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 12 पैकी 5 मुली या बारामधील कपाटात लपवलेल्या अवस्थेत सापडल्या. पोलिसांनी स्वत: या कारवाईची माहिती दिली आहे. बारमध्ये बेकायदेशीररित्या मुलींना ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या बारवर छापा टाकला. यावेळी संबंधित बारमध्ये अनैतिक आणि बेकायदेशीर प्रकार सुरु असल्याचं निष्पन्न झालं.

    बटन दाबून किंवा लाथ मारुन उघडायचा दरवाजा

    पोलिसांनी बारचा कानाकोपरा तपासला. यावेळी पोलिसांना एक दरवाजा दिसला. पोलिसांनी तपास केला असता तिथे एक बटन दाबलं की एक भुयाराचा दरवाजा उघडतो. खरंतर ते एक कपाट असल्याचं निष्पन्न झालं. या कपाटीत 5 मुली होत्या. ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी सर्व मुलींची सुखरुप सुटका केली. या कपाटीत श्वास घेणंही कठीण होतं, अशा कपाटीत मुली लपलेल्या अवस्थेत सापडल्या.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा