Mumbai Rain Update: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईतील तुरळक ठिकाणीही पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पालघर, ठाण्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. तर मुंबईमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शनिवारी Anant Chaturdashi Visarjanच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाचा जोर कमी होऊन मध्यम सरींची शक्यता आहे. पालघरमध्ये काही ठिकाणी शनिवारीही मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण कोकणात रायगडला गुरुवारी आणि शुक्रवारी, तर रत्नागिरीला गुरुवारी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी अति मुसळधार सरींची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली.
कारखान्यातील भीषण स्फोटाने 10 गावांमध्ये हादरा: एकाचा जागीच मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी, नागपुरात खळबळ
किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन IMD ने केलं आहे.
कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि वादळे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे.
दरम्यान, गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.

