Manoj Jarange Objection Two Words in GR : मनोज जरांगेंचा मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष सुरु होता. त्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. थोड्याच वेळात याबाबतचा जीआर (GR) सरकार जरांगेंच्या हातात देणार आहेत. मात्र, या जीआरमधील दोन शब्दांवर पाटलांनी आक्षेप घेतलाय.
‘मराठवाड्यातील मराठ्यांसाठी हे मोठं यश आहे. पण शासन निर्णयानंतर थोडीजरी फसवणूक झालं तर महाराष्ट्रात एकही नेता आणि मंत्र्याला फिरु देणार नाही’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जीआर काढण्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी रवाना झाले आहेत. सरकारकडून जीआर काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. जो मसुदा उपसमितीने जरांगेंसमोर ठेवला होता, त्याचप्रमाणे आरक्षणाचा जीआर निघणार आहे. मसुद्यात पात्र व्यक्तींचा कुणबी किंवा मराठा-कुणबी असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, मसुद्यातील ‘पात्र’ आणि ‘अशात’ या दोन शब्दांवर जरांगेंनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जीआरमधून हे दोन शब्द काढण्यात येणार आहेत.
Manoj Jarange Patil : ‘तर महाराष्ट्रातला एकही नेता आणि मंत्री फिरु देणार नाही’, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. ‘आपण लढाई जिंकलो आहोत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल’, असा विश्वास सरकारने दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ‘जीआर निघाल्यावर एका तासात मुंबई सोडतो’, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यावर सरकारनेही ‘एका तासात आम्ही जीआर काढतो’, असं म्हटलं आहे.
Maratha Reservation : लढाई जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा! पण जीआर कधी निघणार? मोठी माहिती समोर
मनोज जरांगे काय म्हणाले?
‘सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मन:पूर्वक कौतक करतो आणि स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार. सगळे अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेनं समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरुपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात देणार आहे. तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार जीआर काढणार आहे’, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

