Nilesh Rane on Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी नितेश राणेंचा चिंचुद्री असा उल्लेख केल्यामुळे नितेश राणेंचे बंधू निलेश राणे भडकले असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांनी ट्वीटवर मनोज जरांगेंवर पलटवार केलाय.
जरांगे पाटलांचा पलटवार
‘चिचुंद्रीचे कधी पाय मोजता आले आहेत का? तिचा पायाचा मेळच लागत नाही. चिंचुद्री सर्व ऋतूत लाल असते. शिवाय ती काय म्हणते हे देखील कळत नाही. त्यामुळे एकदा आंदोलन संपू द्या, नितेश राणेंना बघतोच’, असा सज्जड दमच जरांगे पाटलांनी दिला होता. जरांगे पाटलांच्या या टीकेवर आता राणे बंधू भडकले असून नितेश राणेंनंतर आता, त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीही ट्वीट (एक्स) करत जोरदार पलटवार केला आहे.
‘काय उपयोग रे तुमचा?’, मनोज जरांगे आपल्या आंदोलकांवर संतापले
निलेश राणे नेमकं काय म्हणाले?
नितेश राणे एखाद्या विषयावर बोल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा, पण वयक्तिक टीका नको. नितेश काही टोकाचं बोलला नाही, किव्हा वैयक्तिक बोलला नाही. कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही, तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही राणे पण असतो. आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोण हाथ टाकायच्या वार्ता करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही, म्हणून भाषा जपून वापरली पाहिजे. कारण आम्ही तुम्ही काही परके नाही. विषय सोडवताना नातं तुटता कामा नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे राहिले, कौटुंबिक राहिले ते तसेच राहिले पाहिजे. मी आज पर्यंत नातं जपलं, पुढे ही जपेन… आपल्याकडून पण तीच अपेक्षा आहे.

