काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात मुंढव्यातील पिंगळे वस्ती परिसरातील एका पबमध्ये फ्रेशर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतलेली नव्हती. पार्टीतील तरुणांनी रस्त्यात मद्याच्या बाटल्या फोडल्याने रहिवासी आक्रमक झाले आणि त्यांनी पबचालकाला जाब विचारल्याने वाद निर्माण झाला होता.
रहिवाशांची तक्रार, मनसे आक्रमक
या प्रकरणी रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर २३ ऑगस्टला मध्यरात्री राजा बहाद्दूर मिल परिसरातील किकी हॉटेलमध्ये मोठी फ्रेशर पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीत १०० ते १५० महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झाले होते. विद्यार्थी अल्पवयीन असूनही त्यांना मद्य विक्री केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. चौकशीत पब व हॉटेलमालकाने पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाची परवानगी न घेतल्याचे उघड झाले. परिणामी, या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल
या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरातील काही बार, पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीनांना मद्य विक्री केली जात आहे. नियम मोडणाऱ्या आयोजक व इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल.’
ना व्हिडिओ, ना फोटो! राज ठाकरेंनी मनसैनिकांना सांगितला नवा प्लॅन, सिक्रेट भाषण व्हायरल
पोलिसांनी यापूर्वी हॉटेलमालकांना कोणत्याही पार्टीसाठी पूर्वसूचना किंवा परवानगी घेणे बंधनकारक असल्याची सूचना केली होती. मात्र, आयोजक व हॉटेलमालकांनी ती सूचना न पाळता बेकायदेशीरपणे पार्टीचे आयोजन केले, असे तक्रारीत नमूद आहे.
