• Wed. Jul 1st, 2026

    Shivsena News: सचिन अहिरांकडून अचानक धक्का, ठाकरेंचा जुना शिलेदारही बंडाच्या तयारीत? सुनील शिंदेंकडून पहिल्यांदाच खुलासा

    Shivsena News: सचिन अहिरांकडून अचानक धक्का, ठाकरेंचा जुना शिलेदारही बंडाच्या तयारीत? सुनील शिंदेंकडून पहिल्यांदाच खुलासा

    मुंबई: विधानपरिषद आमदार आणि ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या सचिन अहिर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत सातत्याने दिसणाऱ्या सचिन अहिर यांनी अचानक ठाकरेंची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आदित्य ठाकरे ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्याच वरळीतून याआधी अहिर हे निवडून आलेले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आदित्य यांच्यासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच वरळीचे माजी आमदार आणि विधानपरिषदेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे हेदेखील वेगळ्या विचारात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील शिंदे यांनी खुलासा केला असून माझ्याविषयी जाणूनपूर्वक खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हटलं आहे.

    पक्षांतराविषयी सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सुनील शिंदे यांनी म्हटलं आहे की, “स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी काल एक पक्षप्रवेश झाला. या प्रवेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई व वरळीतील मतदार, नागरिक आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. मागील सात वर्षांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद आमदारकीसह पक्षातील अनेक महत्त्वाची पदे व सन्मानाची जबाबदारी दिल्यानंतरही केवळ स्वार्थासाठी केलेल्या या गद्दारीचा समाजमाध्यमांवरही सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. या सर्व घडामोडींमुळे आत्मविश्वास गमावलेल्या आणि पायाखालची वाळू सरकलेल्या काही लोकांकडून माझी राजकीय बदनामी करण्याचा तसेच शिवसैनिक आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून माझ्याबाबत जाणीवपूर्वक खोट्या आणि बिनबुडाच्या बातम्या माध्यमांमध्ये पेरल्या जात आहेत. या सर्वामागील सूत्रधार कोण आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेला आणि शिवसैनिकांना ठाऊक आहे. माध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या या अफवांमध्ये आणि बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” अशा शब्दांत सुनील शिंदे यांनी त्यांच्याबाबत होत असलेल्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

    “मी कालही शिवसेनेसोबत होतो, आजही शिवसेनेसोबतच ठाम उभा आहे आणि उद्याही राहणार आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुखांच्या आदेशाने, तसंच निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर मुंबईकर आणि वरळीकरांच्या सेवेसाठी अखंडपणे कार्यरत राहणार आहे,” असा विश्वासही सुनील शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान, सुनील शिंदे यांनी जरी आपण ठामपणे ठाकरेंच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले असले तरी आगामी विधानसभा निवडणूक आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोपी ठरणार नाही. कारण २०१९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं निश्चित केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या सचिन अहिर यांना आपल्या पक्षात आणून विधानपरिषदेत आमदार केलं, तर तेव्हा विधानसभेत वरळीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनील शिंदे या पक्षातील शिलेदारालाही विधानपरिषदेत संधी दिली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ८ हजारांच्या काठावरील मताधिक्याने ते वरळीतून निवडून आले होते. अशातच सचिन अहिर यांनी त्यांची साथ सोडल्याने या मतदारसंघात त्यांना २०२९ मध्ये विजयाची समीकरणे जुळवून आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *