• Mon. Jun 15th, 2026

    ‘वोट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून साखर चोरी’; एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब थोरातांवर टीका

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    ‘वोट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून साखर चोरी’; एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब थोरातांवर टीका

    Eknath Shinde Criticism of Balasaheb Thorat : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जहरी टीका केली आहे. साखर पोत्यांची चोरी झाली असल्याचा धागा पकडत शिंदेंनी थोरातांना लक्ष्य केलं. एकनाथ शिंदे आज संगमनेरमध्ये आले होते, तेव्हा ते बोलत होते.

    एकनाथ शिंदेंची बाळासाहेब थोरातांवर टीका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    अहिल्यानगर : ‘वोट चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्यांच्या काळात अनेक गैरव्यवहार झाले. मोठे घोटाळे झाले. संगमनेरमध्येही सहकारी साखर कारखान्यातून गोदामाला बोगदा पाडून साखर पोत्यांची चोरी झाली होती,’ अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

    संगमनेरचे शिवसेनेते आमदार अमोल खताळ यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि आभार यात्रेच्या निमित्ताने शिंदे रविवारी संगमनेरमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. पक्षाचे आमदार आणि महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अलीकडेच संगमनेरमध्ये थोरात आणि कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यात वाद झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेकडे लक्ष लागले होते. सभेत कीर्तनकार आणि वारकऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांचा सन्मानही करण्यात आला. या वारकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला.

    Maharashtra Timesएकनाथ शिंदे यांच्या रॅलीवेळी शिवसैनिकांचा मोठा गोंधळ, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

    लाडक्या बहिणींनी पाठीत जोडा मारला

    शिंदे पुढे म्हणाले की, ‘आमदार खताळ यांना निवडून देऊन संगमनेरमधील मतदारच जायंट किलर ठरले आहेत. चाळीस ‌वर्षांची येथील सत्ता मतदारांनी उलथवून लावली. आता विकासाची जबाबदारी आमची आहे. लाडकी बहीण योजनेसंबंधी विरोधकांनी सुरवातीपासूनच अपप्रचार केला. त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला, माात्र लाडक्या बहिणींनी त्यांच्या पाठीत जोडा मारला. ही योजना कदापी बंद होणार नाही,’ असे सांगून शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे तसेच संगमनेर मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या मदताची कौतूक केले.

    Maharashtra Timesआधी म्हणाल्या, मी मटन खाल्लेलं पांडुरंगाला चालतं, वाद उफाळल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया काय?

    शिवसैनिकांचा गोंधळ, लाठीमार

    सभेपूर्वी एखनाथ शिंदे यांची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी नियोजन कोलमडल्याने शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. परिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिंदेंनी मात्र यावर काहीही भाष्य केले नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना देखील यावेळी धारेवर धरलं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा