Uddhav Thackeray : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझी कुठलीच नाराजी नाही, मात्र त्यांनी मला दिलेलं आश्वासन मोडलं, असं म्हणत ठाकरे गटाला त्र्यंबक तुपे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझी कुठलीच नाराजी नाही. मात्र मला वार्डाच्या विकासाचा विचार करणे गरजेचे आहे, असे म्हणत ठाकरे गटाला त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्र्यंबक तुपे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. लवकरच दोन माजी आमदारही शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली आहे.
कोण आहेत त्र्यंबक तुपे?
त्र्यंबक तुपे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे छत्रपती संभाजीनगर शहरातील महत्त्वाचे नेते आहेत. राज्यात बाळासाहेब ठाकरेंची लाट असताना त्र्यंबक तुपे यांनी 1988 मध्ये शिवसेनेत काम सुरु केलं. त्यांच्या कामामुळे त्यांना पक्षात संधी मिळत गेली.
Ahilyanagar News : अजित दादांचा शिलेदार सापळ्यात अडकला, पोलिसासाठी दीड लाखांची लाच घेताना NCP नेत्याला रंगेहाथ अटक
2016 मध्ये तुपेंना महापौर होण्याची संधी मिळाली. त्यासोबतच त्यांनी सभागृह नेते, महापौर, सभापती पदासोबतच शिवसेनेच्या ग्रामीण भागाचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील काम केला आहे. त्यांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख या पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे म्हणत ठाकरे गटाला डिवचलं, संजय शिरसाट काय म्हणाले?
Anil Dhanorkar : खासदाराच्या घरात फूट, भाजपचा दणका, काँग्रेस नेत्याच्या दिराचा दिमाखात पक्षप्रवेश
ठाकरेंबाबत तक्रार नाही मात्र आश्वासन मोडले
मी पक्ष सोडत असलो तरी माझी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी किशनचंद तनवाणी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. किशनचंद तनवाणी यांच्यानंतर राजू वैद्य यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. मला जिल्हाप्रमुख पदासाठी शब्द दिला होता तो पाळला नाही. आता मला माझ्या वॉर्डाच्या विकासासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा त्र्यंबक तुपे म्हणाले.

