Solapur Mother Ends Life with Two Children : सणासुदीला गावी आल्यानंतर चार दिवस सुखाचे जातील असे वाटले होतं. मात्र कौटुंबिक वादाच्या एका ठिणगीने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं.
सांगोला घेरडी मुलांसह आईची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : कौटुंबिक वादातून आईने आपल्या पोटच्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी 1 जुलै रात्री साडे सातनंतर सांगोला तालुक्यातील घेरडीत ही घटना घडली आहे. वैष्णवी आशिष यमगर (वय 28), तेजश्री आशिष यमगर (वय साडेतीन महिने) आणि रुद्राक्ष आशिष यमगर (वय 15 महिने) अशी त्यांची नावे आहेत.
नेमकी घटना काय?
बुधवारी 1 जुलै रात्री कुटुंबातील ही मंडळी जेवण करीत बसली होती. वडील आशिषसोबत जेवणाऱ्या पोटच्या दोन मुलांना वैष्णवीने ताटावरून उठवलं. लेकरांना झोपवते म्हणत घराबाहेर आणलं आणि आईने त्या दोन लेकरांसोबत त्यांच्या विहिरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. मृत वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले (रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) यांनी या घटनेची माहिती दिली असून, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या उपाययोजना; महिला डब्यासाठी कोणता निर्णय घेतला?
आई-वडिलांनीही समजूत काढलेली
आशिष यमगर हा मुंबईत ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. त्यामुळे तो पत्नी वैष्णवी, मुलगी तेजश्री व मुलगा रुद्राक्ष असे मिळून मुंबईत कुटुंबासह राहतात. सोमवारी कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आशिष कुटुंबासह गावी घेरडीला आला होता. दरम्यान, पती-पत्नीत कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे वैष्णवी चिडलेली होती.
बुधवारी रात्री 7:30 वाजता यमगर कुटुंबीय एकत्रित बसून घरात जेवत असताना संतापलेल्या वैष्णवीने दोन्ही मुलांना घराबाहेर नेलं. बराचवेळ झाला तरी वैष्णवी परत आली नाही, म्हणून यमगर कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला आवाज दिला असता कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. रात्री विहिरीत वैष्णवी पाण्यावर तरंगताना आढळून आली. रात्री 12 वाजता खोल पाण्यात दोन्ही मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून यमगर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.
Pune Crime : बांधकाम साइटवर गप्पा मारताना शाब्दिक चकमक, जमिनीच्या वादातून मध्यरात्री पुण्यात जोरदार राडा; शिंदे गटाच्या नेत्याकडून गोळीबार
वैष्णवीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं
वैष्णवीचे वडील बाळू थोरबोले यांनी बुधवारी घेरडी येथे येऊन यमगर कुटुंबाशी चर्चा केली. आई-वडिलांनी वैष्णवीची समजूत काढून सायंकाळी 5:30 वाजता गावी निघून गेले होते. परंतु, वैष्णवीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं, हे तिने मुलांसह आयुष्य संपवून स्पष्ट होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा