Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासी म्हणून संबोधण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी याबाबतचे परिपत्रक निघण्याचे संकेत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत कोकणवासीयांच्या संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याने सरकारी कागदपत्रे आणि सरकारी कामकाजात त्याऐवजी कोकणवासी हा शब्द वापरण्याची आग्रही मागणी केली होती.
Maharashtra Weather Update: गणेशोत्सवातही पाऊसमारा? पावसाबाबत हवामान विभागाकडून 2 आठवड्यांचा अंदाज जाहीर
‘चाकरमानी’ हा मराठी शब्द प्रामुख्याने कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतरित झालेल्या व्यक्तींसाठी वापरला जातो. गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नागरिक कामाच्या, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून उदरनिर्वाह करतात. परंतु या नागरिकांनी कोकणाशी असलेली कौंटुंबिक नाळ जोडून ठेवली आहे. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी किंवा इतर सणांसाठी हे लोक मोठ्या संख्यने आपल्या गावी परतत असतात. गावाकडे त्यांचा उल्लेख ‘चाकरमानी’ असा केला जातो.
Water Level In Dams: राज्याची पाणीचिंता मिटली! मोठ्या धरणांमध्ये ८८.६५ टक्के पाणी; जलसंपदा विभागाचा अहवाल
चाकरमानी हा शब्द मराठीतून आला असून, चाकर (सेवक) आणि मानी (मानणारा) यांच्या संयोगातून तयार झाला आहे. मात्र, कोकणवासीयांच्या काही संघटनांना हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी चाकरमानी या शब्दावर हरकत घेतली आहे. त्यांच्या मते, हा शब्द कोकणवासीयांच्या मेहनतीला आणि स्वाभिमानाला कमी लेखणारा आहे. त्यामुळे या संघटनांच्या मागणीनुसार महायुती सरकार कडून चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासीयांच्या सांस्कृतिक ओळखीला सन्मान देण्यासाठी कोकणवासी हा शब्द वापरण्यात येणार आहे.

