Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती आपल्या दीरासोबत फरार झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
सुनील द्वेवेदी आणि स्मिता द्वेवेदी असं मारहाण करून पसार झालेले आरोपी सख्खा भाऊ व पत्नीचे नावं आहेत. तर पुष्पेंद्र केवलप्रसाद द्वेवेदी (वय ४०, रा. विटावा, ता. गंगापूर) असं जखमी झालेल्या भावाचं नाव आहे. या प्रकरणी पुष्पेंद्र द्वेवेदी यांनी फिर्यादीत म्हटलं की, ‘मी पत्नी मुलांसह विटावा परिसरात राहतो. परिसरातील कंपनीत काम करून मी कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुष्पेन्द्र यांची पत्नी स्मिता आणि भाऊ सुनील यांच्यात प्रेमसंबंध असल्याची कुणकुण पुष्पेंद्र यांना लागली. १८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पुष्पेंद्र हे नाईट शिफ्ट रद्द झाल्याने घरी आले. घरी आल्यानंतर त्यांची मुले झोपलेली होती. याचवेळी फिर्यादी पुष्पेंद्र यांना पत्नी सख्या भावासोबत असल्याचं दिसलं. दोघांना विचारणा केली असता पत्नी व भावाने फिर्यादीला मारहाण केली. खलबत्त्याची मुसळी डोक्यात घातली ‘तू घरी परतलास तर तुला जीवे मारून टाकीन’, अशी धमकी दिली. त्यानंतर भाऊ सख्या भावाच्या पत्नीला घेऊन मोटारसायकलवरून पसार झाले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Vinod Kambli Health Update: फूल बॉडी चेकअप, १० दिवसांचं रिहॅब अन् समोर आलं विनोद कांबळीला नेमका प्रॉब्लेम आहे तरी काय…
तीन दिवसांत दोन भावांचा मृत्यू
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या मुद्देशवडगाव येथे दोन चुलत भावांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या दोघांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. लहान भाऊ सिद्धार्थचा खून केल्यानंतर पोलीस तपासात आपण सापडले जाऊ, या भीतीने आरोपी स्वप्निल चव्हाण याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी स्वप्निल व सिद्धार्थ या चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झाले होते. या रागातून स्वप्निलने बिस्किट आणायला जाणाऱ्या आपल्या 12 वर्षीय चुलत भावाला संपवले. पोलिसांना आपण खून केला हे कळेल, या भीतीने आता आरोपी चुलत भावाने स्वतःही विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. भावकीतील वादातून घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

