Dahi Handi 2025 : ठाणे, कल्याण-डोंबिवलीत २१ गोंविदा जखमी, जखमींमध्ये पाच वर्षांचा चिमुकला, एका गोविंदाला उपचारासाठी मुंबईला हलवले
दहीहंडीचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचला असतानाच शनिवारी ठाण्यात १७ तर कल्याण-डोंबिवलीमध्ये ४ असे एकूण २१ गोविंदा जखमी झाले. या गोविंदाच्या डोक्याला, हात, पाठ, कंबरेला दुखापत झाली असून काहींवर रुग्णालयात तर काहींना रुग्णालयातून उपचार करुन सोडून देण्यात आले. या जखमींपैकी एकाचे वय अवघे पाच वर्ष असून त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. तर, १८ वर्षांच्या एका तरुणाला उपचारासाठी ठाण्यातून मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवले आहे.
