Beed News : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरात बहीण-भावाला बेदम मारहाण
बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरातील भगवान बाबा चौकात बहीण-भावाला विनाकारण बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत विष्णू सादुळे रात्री पान टपरीवर गेले असता, संशयित संदेश सुरेश कराड आणि आशिष चव्हाण यांनी त्यांना बाहेर खेचून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
