NCP Leader Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रक्षाबंधनादिवशी त्यांच्या मावसभावाचे निधन झालं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी माहिती दिली आहे.
रूपाली चाकणकरांची पोस्ट
बाळराजे, रक्षाबंधनाच्या दिवशी तुझं असं सोडून जाणं प्रचंड वेदनादायक आहे. अफाट प्रेम, प्रचंड काळजी घेणारा तू, मनापासून सगळं बोलणारा, असं कसं न सांगता निघून गेला. न सांगता गेलास….. काय आणि कशी श्रद्धांजली वाहू, अशी पोस्ट करत रूपाली चाकणकर यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेबाबत विविध राजकीय, सामाजिक आणि महिला संघटनांकडून बाळराजे माळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत असून, रक्षा बंधनाच्या दिवशीच झालेला हा विरह चाकणकर कुटुंबासाठी आयुष्यभर विसरता न येणारा ठरला आहे.
दरम्यान, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाचं निधन म्हणजे प्रत्येक बहिणीसाठी मानसिक धक्का असतो. बाळराजे माळी यांच्या जाण्याने रूपाली चाकणकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवत बाळराजेंच्या निधनावर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

