Beed Political News : स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका तोंडावर असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडेंपासून त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावर राजाभाऊ मुंडेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होत असलेल्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. वडवणी शहरात अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आहे आहे. मात्र या लावलेल्या बॅनरवर मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कुठेच फोटो लावण्यात आला नाही. याविषयी बोलताना राजाभाऊ मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याचा विकास खुटत जात आहे आणि या जिल्ह्यावर आता अजित पवार यांनी लक्ष घातले आहे म्हणून आम्ही भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सोबत जात असल्याचं राजाभाऊ मुंडे यांनी सांगितलं आहे.
Beed News : महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट, SIT प्रमुख पंकज कुमावतांनी खेळली चाल, लवकरच…
मला पंकजा मुंडेंबद्दल काही बोलायचे नाही. मी त्यांची साथ सोडून दुसरीकडे जात आहे म्हणून सादा त्यांनी मला कॉल देखील केला नाही. आमदार प्रकाश सोळंके हे आमच्या माजलगाव मतदार संघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत. जर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनजंय मुंडे असते तर आम्ही त्यांचा ही फोटो या बॅनर वर लावला असता. मात्र आता आम्हाला गरज वाटली नाही म्हणून आम्ही त्यांचा फोटो बॅनरवर लावला नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी राजाभाऊ मुंडे यांनी बोलताना दिली.

