Chhatrapati Sambhajinagar School Bus Girl Molestation : “तू खूप क्युट आहेस, आपण दोघे फिरायला जाऊ, शाळेतून यायला उशीर होईल असं आई बाबांना सांग” असं म्हणत स्कूल बस चालकाने मुलीला अश्लील स्पर्श केला
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नामांकित शाळेत अनुष्का (नाव बदलले आहे) चौथ्या वर्गामध्ये शिक्षण घेते. तिची शाळा सकाळच्या सत्रात भरते. शाळेत ये-जा करण्यासाठी आई-वडिलांनी अनुष्काला स्कूल बस लावून दिली होती.
नेमकं काय घडलं?
घटनेच्या दिवशी दुपारी दोन वाजता अनुष्काची शाळा सुटली. ती स्कूल बसमध्ये जाऊन बसली. सर्व मुलांना सोडल्यानंतर अनुष्का बसमध्ये एकटीच होती. यावेळी गणेश मस्के हा अनुष्का जवळ आला. “तू खूप क्युट आहेस, आपण दोघे फिरायला जाऊ, शाळेतून येण्यास उशीर होईल असं आई बाबांना सांगून टाक” असं म्हणत त्याने अनुष्काला अश्लील स्पर्श केला. यामुळे घाबरलेली अनुष्का रडू लागली. तेव्हा, ही गोष्ट कुणालाच सांगू नको, असा दम त्याने दिला. त्यानंतर गणेशने तिला घरी सोडले.
Mumbai Crime : बॉयफ्रेण्डशी शरीरसंबंध ठेवताना प्रायव्हेट पार्टला दुखापत, दादर रेल्वे पोलिसांना भलतंच सांगितलं, अखेर CCTV पाहिले अन्…
सायंकाळी अनुष्काची आई कामावरून घरी परतली. त्यानंतर अनुष्काने रडत आपबिती सांगितली. हा प्रसंग ऐकून आईला धक्का बसला. तिने तात्काळ ही बाब पती व दिराला सांगितली. कुटुंबीयांनी तात्काळ मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Crime News : पतीपासून विभक्त, 27 वर्षीय तरुणीला वकिलाने जाळ्यात ओढलं; आजारपणातही शरीरसंबंधांचा दबाव, दोनदा गर्भपात
पोलिसांकडून गुन्ह्याची लपवालपवी
अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी 31 जुलै रोजी कारवाई करण्यात आली. मात्र या प्रकरणात पोलिसांनी माहिती देण्याचं टाळलं. गुन्हेगारी रोखण्यात अपयश की शाळेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? असा सवाल या निमित्ताने नागरिक विचारत आहे.

