Pune Koregaon Park Hit and Run Case : आयुष प्रदीप तायाल याने गेल्या वर्षी दारुच्या नशेत ‘ऑडी’ कार भरधाव चालवून 21 वर्षीय ‘डिलिव्हरी बॉय’ रौफ शेख याला उडवलं होतं. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयुषविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी हा आदेश दिला. आरोपीने स्वच्छ हाताने न्यायालयात येण्याऐवजी खोटेपणा, दिशाभूल आणि माहिती लपविण्याचा वारंवार प्रयत्न केला. त्यामुळे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर झाला असून, न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला; तसेच जनतेचा निधी असलेल्या सरकारी तिजोरीवरही ताण आला, अशी गंभीर निरीक्षणे नोंदवून न्यायालयाने आरोपीला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. आरोपीने दंडाची रक्कम 15 दिवसांत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
आयुष प्रदीप तायाल, वय 34, रा. मगरपट्टा सिटी, असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत ‘ऑडी’ कार भरधाव चालवून 21 वर्षीय ‘डिलिव्हरी बॉय’ रौफ शेखच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आयुषविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना 11 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर घडली.
Satara Crime : साखरपुड्यानंतर दोन दिवसात कृष्णा नदीत उडी, वाघमारे कुटुंबाने लेकीच्या बॉडीचे दोन हात पाहिले अन् ढसाढसा रडू लागले
या प्रकरणी आयुषविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपीने आठव्यांदा जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला. त्याला सरकारी वकील जावेद खान यांनी विरोध केला. आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, अशी भीती तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावला.
पोलिसांकडून अपमान, अर्वाच्य भाषेचा वापर, कोथरूडमध्ये तरुणींचा ठिय्या; रोहित पवार आले धावून
Pune News : पती शरीरसंबंध ठेवण्यास सक्षम नाही, पुण्यात विवाहितेचा आरोप, कोर्ट म्हणालं दोन महिन्यात सासरी जाऊन…
‘चांगले पीक घेण्यासाठी योग्य बियाण्यांची लागवड आवश्यक असते. मात्र, बियाणेच खराब असेल, तर चांगले पीक कसे येणार? पक्षकाराचे वर्तन आणि कृती अयोग्य असेल, तर त्याची कार्यवाही कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक व सावधगिरीने हाताळणे आवश्यक आहे,’ असेही न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे.

