Solapur News : सोलापरमध्ये दोन तरुणांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. जाहिरातीचं बोर्ड काढताना ही हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, दोन चिमुकले बापाविना पोरके झाले आहेत.
चंद्रशेखर नारायण दोन्तुल (वय 42, रा. विठ्ठल नगर) आणि गंगाधर ताटी (वय 40, रा. सुनील नगर) अशी मृतांची नावे आहेत. अशोक पोगुल यांच्या घराच्या गच्चीवर जाहिरात फलक काढण्याचे काम सुरू असताना महावितरणच्या सर्व्हिस वायरचा स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
Buldhana News : घराजवळ विजेचा धोकादायक खांब, विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणाने शेतकऱ्याचा करुण अंत
नाष्टा करत होते तेव्हाच घेऊन गेले अन् आक्रीत
चंद्रशेखर यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. चंद्रशेखर यांच्या पत्नीने सांगितले की, ते घरी कुटुंबासोबत नाश्ता करत होते. जाहिरातीचं बोर्ड काढायचं आहे असं सांगून त्यांना घेऊन गेले. आमच्या कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे. दोन्ही मुलं बापाविना पोरकी झाली आहे. शासकीय रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता.दोघांच्या मृत्यूच्या घटनेनंतर सोलापूर शहर परिसरात खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी दोघांचा आधीच मृत्यू झाल्याची माहिती दिली. ही बातमी समजताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती. मृतांपैकी एकाच्या पत्नीने माझी पोरं पोरकी झाली… अस रडत रडत सांगितलं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

