Bhiwandi Accident News : रक्षाबंधनाचा सण तोंडावर असताना भिवंडीमध्ये एका १८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. आता कोणाला राखी बांधू? असं म्हणत त्याच्या बहिणीने हंबरडा फोडलेला. त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.
रक्षाबंधन सण काही दिवसांवर आला असतानाच भिवंडी-वाडा महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घराजवळच असलेल्या खड्ड्यांमुळे 18 वर्षीय यश मोरे याचा अपघात झाला आणि दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याने प्राण सोडला. यावेळी यशची बहीण मात्र अश्रूंच्या ओघात प्रशासनाला एकच सवाल विचारत होती. “आता कोणाला राखी बांधू?” ही हृदयद्रावक घटना पहाटेच्या वेळी घडली.
Raj Thackeray : ‘माज असाच ठेचला जाईल’; निशिकांत दुबे यांच्या मराठीविरोधी वक्तव्यावरून मनसेचा तीव्र संताप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जुलै रोजी मडक्याचा पाडा येथे राहणारा युवक यश मोरे व त्याचा मित्र यश बालाजी घुटे,वय 18,रा. विश्वभाती फाटा असे दोघे सकाळी लवकर व्यायाम करण्यासाठी कवाड येथील व्यायामशाळेत जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून दोघेजण खाली पडल्याने दोघे गंभीर जखमी झाले होते. दोघांवर ठाणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
कल्याणमध्ये थाटला UPSC चा क्लास, विद्यार्थ्यांना धमकी, मनसेकडून प्रसाद, आरोपी गजाआड
दहा दिवसांच्या उपचारानंतर यश मोरे याची प्राणज्योत बुधवारी सकाळी मावळली. या घटने नंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असताना सायंकाळी मृतदेह घरी अंत्यसंस्कारासाठी घेऊन आले असता. मटक्याच्या पाडा येथे जमा झालेले कुटुंबीय नातेवाईक ग्रामस्थ यांनी खड्ड्यांमुळे आपल्या मुलाचा जीव गेल्याने सर्वांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन सुरू केले. या दुर्दैवी घटनेनंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी सायंकाळी एन गर्दीच्या वेळी रास्तारोको आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली आहे. ज्याचा फटका घरी जाणाऱ्या चाकरमानी विद्यार्थी यांना बसला आहे.
Kalyan News :कल्याणमधील कचोरे टेकडीवरील माती खचली, प्रशासनाकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्याचे काम सुरू
या आंदोलनानंतर पोलिस उपअधीक्षक राहुल झालटे,तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हर्षवर्धन बारवे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजूत काढत योग्य तो गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृत यशचे वडील राजेश मोरे यांचा पुरवणी जबाब घेऊन त्यामध्ये रस्त्याचे ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची नावे गुन्ह्यांमध्ये समाविष्ट केल्यानंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह घरी नेला.त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत करण्यास सुरुवात केली.
