Nitesh Rane on Rohit Pawar : भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे भाजपमध्ये येणार असल्याचा दावा केला आहे. नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.
अजितदादांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रोहित पवार भाजपमध्ये येणार या केलेल्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया देताना सांगितलं की, होय यामध्ये आश्चर्य काय असा सवाल करत ते म्हणाले की 2019 मध्येच ते येणार होते असा पुनरुच्चार करत ते कुठल्या कुठल्या भाजपच्या नेत्यांना कधी कधी भेटतात हे जर का मी सांगितलं आता आम्ही हे बोलायला लागलो ना तर त्यांना तोंड वाचवायलाही जागा राहणार नाही. ते मनाने भाजपचे आहेत फक्त शरीराने ते शरद पवार साहेबांबरोबर आहेत, असं खळबळजनक वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही दिवसात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान सुरु’, रामदास कदम यांनी उपस्थित केली शंका
लवकरच मुंबई ते सिंधुदुर्ग सागरी सेवा सुरू
कोकण आणि मुंबई हे अंतर सागरी मार्गामुळे जवळ येणार आहे. म्हणजे आपण मुंबईतील माझगाव ते रत्नागिरी तीन तास पुढे विजयदुर्ग सिंधुदुर्ग साडेचार तास अशा पद्धतीचा प्रवास हा येणाऱ्या काही दिवसातच आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये एक स्टॉप रत्नागिरीसाठी असेल त्यामुळे आपण मुंबईतून अवघ्या तीन तासांमध्ये येऊ शकणार आहोत. पुढील स्टॉप हा विजयदुर्गचा असेल. दीडशे गाड्या आणि पाचशे पॅसेंजर अशा पद्धतीची एम टू एम फेरी हे आपण लवकरच सुरू करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. याबद्दल लवकरच सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आम्ही मुख्यमंत्रीसाहेबांचे अध्यक्षतेखाली या सगळ्या गोष्टी जाहीर करू असेही राणे म्हणाले.

