Pranjal Khewalkar Pune: पुण्यात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकून या कारवाईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली. पार्टीत अमली पदार्थ सेवन केले जात होते. पोलिसांनी खेवलकर यांच्या घराचीही झाडाझडती घेतली.
खराडी परिसरातील इमारतीत रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ पडकल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. तिथं वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर खेवलकर यांना परत हडपसरच्या घरी आणण्यात आले. या घराची झाडाझडती घेत पोलिसांनी लॅपटॉप, हार्ड डिस्कसह विविध साहित्य जप्त केल्याचे समजते.
मोठी बातमी: उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर; सर्वांच्याच भुवया उंचावल्या
पोलिसांनी हडपसरमधील रोहिणी खडसे यांच्या बंगल्यावर छापा टाकला. तिथे कसून तपासणी केली. पुणे पोलीस दलातील मोठे अधिकारी स्वतः या तपासणीत सहभागी झाले होते.
कोण आहे प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. त्यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. रोहिणी यांनी पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर प्रांजल यांच्याशी लग्न केले. ते दोघे बालपणीचे मित्र आहेत. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंब मुक्ताईनगरमध्ये राहतात. प्रांजल यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी आणि विक्रीचा आहे. रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, प्रांजल यांचा राजकारणाशी संबंध नाही. ते रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहेत. त्यांच्या नावावर साखर कारखाने आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. तसेच, त्यांची एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती आहे. पुण्यात ते रेव्ह पार्टीत सापडल्याने आता या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

