• Wed. Mar 11th, 2026
    Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन? Timetable बघूनच घराबाहेर पडा

    Mumbai Local Mega Block: रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोण​ताही ब्लॉक असणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    mega block (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डातील सर्व मार्ग आणि दिवा मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    मध्य रेल्वे
    स्थानक : ठाणे ते कल्याण
    मार्ग : अप आणि डाउन धीमा
    वेळ : सकाळी ११ ते दुपारी ४
    वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
    गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून कोकणसाठी धावणार १२ स्पेशल ट्रेन्स, असे आहे नियोजन
    हार्बर रेल्वे
    स्थानक : पनवेल ते वाशी
    मार्ग : अप आणि डाउन
    वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
    परिणाम : ब्लॉक वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावर धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान आणि बेलापूर ते खारकोपरदरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत.
    Mumbai Mantralaya: मंत्रालयात आता ऑफलाइन प्रवेश बंद; डिजिप्रवेश १ ऑगस्टपासून अनिवार्य
    ‘दिवा-सावंतवाडी’ला कोलाड, अंजनी थांबा
    मुंबई : कोकणातील कोलाड आणि अंजनी रेल्वे स्थानकातील प्रवाशांना कोकण रेल्वेने दिलासा दिला आहे. गाडी क्र. १०१०५/६ दिवा-सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसला कोलाड आणि अंजनी रेल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. सोमवार २८ जुलैपासून हा थांबा कार्यान्वित होणार आहे. आगामी गणेशोत्सवासाठी पूर्ववत करोनाकाळात हटवलेले थांबे करण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वे आणि रेल्वे मंडळाकडे केली होती. कोकण रेल्वेने त्याला अनुकूलता दर्शवली होती. अखेर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसचा कोलाड आणि अंजनी थांबा देण्याच्या सूचना रेल्वे मंडळाने दिल्या आहेत. यामुळे प्रवासी संघटनांमधून समाधान व्यक्त होत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा