• Mon. Mar 16th, 2026

    आमदार मंगेश चव्हाण यांची एकनाथ खडसेंना थेट शिवीगाळ, ‘आईचं दूध पिलं असेल तर…’ म्हणत दिलं ओपन चॅलेंज

    आमदार मंगेश चव्हाण यांची एकनाथ खडसेंना थेट शिवीगाळ, ‘आईचं दूध पिलं असेल तर…’ म्हणत दिलं ओपन चॅलेंज

    Mangesh Chavan : आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना आज शिवीगाळ केली. त्यांच्या टीकेवर आता खडसे काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना ओपन चॅलेंजदेखील दिलं आहे. एकनाथ खडसेंनी आईचं दूध पिलं असेल तर पुरावे सादर करा, असं ओपन चॅलेंज मंगेश चव्हाण यांनी दिलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जळगाव : भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवीगाळ केली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली जात आहे. खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या कलगीतुरा रंगला आहे. या राजकीय युद्धात मंगेश चव्हाण यांनी उडी घेतली आहे. मंगेश चव्हाण यांनी खडसेंना अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली आहे. “मातब्बर नेते कुणाला म्हणत आहात? हे आधी समजून घ्या. एकनाथ शिंदे हा मातब्बर नेता होऊच शकत नाही. तो भिकारXX नेता आहे. त्याने ज्या पद्धतीने आता हे वक्तव्ये चालू केले आहेत. कुठलेही पुरावे नाहीत. तथ्यहीन बोलायचं. एकनाथ गणपत खडसे, गणपत खडसेंचे चिरंजीव एकनाथ खडसेंच्या विरोधातील पत्रकार परिषद घेतोय. एकनाथ खडसे अपुऱ्या माहितीच्या आधारे नेत्यांची बदनामी करत आहेत”, असा घणाघात मंगेश चव्हाण यांनी केली. “योग्य वेळ आल्यानंतर योग्य थांबवण्याच्या गोळ्या दिल्या जातील’, असाही दम मंगेश चव्हाण यांनी दिला.

    “एकनाथ खडसे गिरीश महाजन यांना यासाठीच टार्गेट करत असतील, कारण ते वैफल्यग्रस्त दिसत आहेत. आता त्यांची बरोबरी ते करु शकत नाहीत. गिरीश महाजन यांनी स्वत:चं नेतृत्व कामातून सिद्ध केलं आहे. सर्व महापालिका, नगरपंचायती, धुळे, जळगाव, नाशिक या सगळ्याच ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली आहे. खडसेंना ते करता आलेलं नाही. मीपणाच्या अहंकारात त्यांनी बरेच वर्ष घातली. त्यांनी 40 वर्षे काम केलं. पण त्यांनी केवळ स्वत: साठी आणि परिवारासाठी काम केलं. ते पक्षासाठी कधीही झाले नाहीत”, अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली.

    “ते गेल्यापासून एकहाती सत्ता यायला सुरुवात झाली. ते जिथे गेले तिथे त्या पक्षाचा पराभव झाला. एकनाथ खडसे हे सपाट पावले आहेत. ग्रामपंचायत गेली, त्यांच्या गावात, परिसरात कोणतंही पद राहिलं नाही. एकनाथ खडसे हे कधीही पक्षाचे नव्हते आणि झालेच नाहीत. त्यांच्यात पक्षांतर्गत कुणी आडवं आलं तर त्यांनी कायम आडवं केलं अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. त्यामुळे खडसेंना फार महत्त्व देण्याची गरज नाही”, असं मंगेश चव्हाण म्हणाले.

    ‘खडसेंनी आईचं दूध पिलं असेल तर…’

    “अलिकडच्या काळात त्यांनी जी हद्द केली, म्हणजे नेत्यांना खालच्या स्तरावर जावून बदनाम करायचं, त्यांच्या परिवारावर जायचं, बघा तुम्ही जे सांगत आहात, अनेक दिवसांपासून सांगत आहेत. खरंच एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या आईचं दूध पिलं असेल तर त्यांनी सर्व पुरावे जनतेसमोर आणावे”, असं चॅलेंज मंगेश चव्हाण यांनी दिलं.

    हनी ट्रॅप प्रकरणात एकनाथ खडसेंचे गंभीर आरोप; आमदार मंगेश चव्हाण यांचं जोरदार प्रत्युत्तर

    ‘यु टर्न करणारा हा सरड्यासारखा माणूस’

    “तुम्ही किती वर्ष असे खोटे आरोप कराल? एकनाथ खडसे यांनी त्यांच्या आयुष्यात जेवढे आरोप केले त्या सगळ्या प्रकरणांचे पुरावे खडसे सादर करु शकले नाहीत. या माणसाचं अति तिथे माती झाली आहे. वयामानाने आम्ही बोलणं टाळत होतो. पण त्यांनी आता पक्षाची आणि नेत्यांची बदनामी करणं चालू केलं आहे. यु टर्न करणारा हा सरड्यासारखा माणूस आहे. अनेक रंग बदलतो. त्याचे रंग समाजासमोर आणावे लागतील”, असंदेखील मंगेश चव्हाण म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा