Madha Crime News : माढा तालुक्यातील अरण येथे एका तरुणाची हत्या झाली, याचा पोलिसांनी तपास लावला आहे. चुलत भाऊ सचिन खंडागळे याने साथीदारांच्या मदतीने त्याला मारलं. आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कार्तिक खंडागळेच्या हत्येप्रकरणात त्याचा चुलत भाऊ सचिन महादेव खंडागळे याला ताब्यात घेण्यात आलं आहे. यापूर्वीच संदेश नावाच्या चुलत भावाला अटक केली असून दोघांना माढा येथील न्यायालयात हजर केलं. आता त्यांना 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Solapur News : आई स्वप्नात आली होती, तिने मला…, १६ वर्षीय मुलाने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत कारणही सांगितलं, सोलापुरात हळहळ
बाहेर घेऊन गेले आणि कार्तिकची हत्या
मुख्य संशयित सचिन खंडागळे आणि एका नातलग महिलेचे अनैतिक संबंध होते. त्या दोघांचे संबंध कार्तिकला माहित झाले होते. या कारणावरुनच सचिन, संदेश आणि आणखी तिघांनी मिळून कार्तिकला गोड बोलून घटनास्थळी नेलं. तिघांनी मिळून त्याचा गळा दाबला, त्यानंतर गळ्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांच्या तपासादरम्यान ही बाब निष्पन्न झाली आहे. या घटनेनंतर इतर तिघे फरार असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
Pune News : ७ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्याला जन्मठेप, डीएनए चाचणीने निकाल फिरला; पुण्यातील घटनेत न्यायालयाचा मोठा निर्णय
आरोपीचं पोलिसांसोबत राहून शोध घेण्याचं नाटक
कार्तिकच्या हत्येनंतर संशयित दोघेही 15 जुलै रोजी पोलिसांबरोबर त्याचा शोध घेण्याचं नाटक करत होते. मृत कार्तिक आणि सचिन व संदेश हे तिघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. सचिनचे नातलग महिलेशी संबंध होते. त्यांना कार्तिकने पाहिलं होतं. कार्तिक त्या दोघांचे संबंध असल्याचं घरात सांगणार असल्याचं म्हणाला होता. त्यावरुन सचिन याच्या सांगण्यावरुन संदेश हा घटनास्थळी घेऊन गेल्याची आरोपींनी पोलिसांपुढे कबुली दिली आहे.
Jalgaon Crime News | महिला टोळीकडूनच मुलीची फसवणूक तर जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना
नेमकं प्रकरण काय?
कार्तिकची हत्या होऊन चार दिवस झाले होते. त्यामुळे त्याचे कुटुंबीय खूप अस्वस्थ होते. त्यानंतर मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. आरोपीला पकडण्याची मागणी होऊ लागली. पोलिसांच्या तपासात CCTV मध्ये मृत कार्तिकचा चुलत भाऊ त्याला दुचाकीवर घेऊन जाताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली आणि उलगडा झाला. १९ वर्षीय चुलत भावांनीच सचिन आणि संदेश खंडागळे याने १० वर्षीय त्यांच्या भावाची निर्घृण हत्या केली.

