Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi Yojana : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला परदेशातून देणग्या स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे, आता परदेशातील व्यक्ती आणि संस्था थेट आर्थिक मदत करू शकतील. यासोबतच, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना मदत करणार आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना रामेश्वर नाईक म्हणाले की, राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून क्राऊड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब व गरजू रुग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राऊड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे.
इमर्जन्सीतील रुग्णाकडून डिपॉझिट घेणार नाही, Deenanath Mangeshkar Hospital संचालकांचा मोठा निर्णय
त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रुग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यासाठी कक्षाच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, कार्पोरेट कंपनी, रुग्णालय आणि त्यासोबत काही प्रमाणात रुग्णांचेही योगदान अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
Nurses Strike : राज्यभरातील परिचारिकांचा संप सुरूच, पाचव्या दिवशी रक्तदान करुन निषेध नोंदवला
यासाठी स्वतंत्र पोर्टलमार्फत अर्ज सादर करावा लागणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत हे पोर्टल कार्यरत होणार आहे. ज्यावेळी रुग्णांच्या उपचाराचा खर्च कोट्यवधीमध्ये असतो, त्यावेळी सर्व योजनांचा फायदा घेऊनही निधीची कमतरता भासते, त्यावेळी क्राऊड फंडिंग महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कॉर्पोरेट कंपन्या / दाते/ ‘एनजीओ’ आणि रुग्णालय मिळून रुग्णांच्या उपचाराकरिता मदत करणार आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत क्राउड फंडिंग सुरू केले जाणार आहे.
वेळेआधी जन्म, हालचालही करेना; डॉक्टरांनी मृत जाहीर केलेलं बाळ घरी शवपेटी उघडताच जिवंत!
सहा महिन्यांतील मदत
१ जानेवारी ते ३० जून २०२५ पर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून १४ हजार ६५१ रुग्णांना १२८ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तर, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ दरम्यान – २ लाख ३२ हजार २६५ रुग्णांना १६५ कोटी ४ लाख २४ हजार ८५७ रुपयांची मदत करण्यात आली आहे.

