Manikrao Kokate Rummy Game Video : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात रमी खेळताना आढळले. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुषमा अंधारे यांनी या घटनेवर टीका केली. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना मंत्र्यांनी असे खेळ खेळणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल ट्रेन्सची यादी जाहीर, कुठे असणार थांबे? पाहा वेळापत्रक
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माणिकराव कोकाटे कोणती तरी पत्त्याची गेम खेळताना दिसत आहेत. तर रोहित पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करताना “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” आणि कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅग वापरत म्हणत निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे.
Ramdas Kadam: आमचा डान्सबार नाही; बारसंबंधी आरोपावर माजी मंत्री रामदास कदम यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो. विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात. लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असं मला वाटतं मात्र ही चर्चा होण्याऐवजी मंत्रिमहोदय ऑनलाइन गेम खेळत असतील तर गंभीर आहे. अजित दादा, शिंदे आणि फडणवीसांची काय परिहार्यता असेल बर ज्यामुळे अशा लोकांना उमेदवाऱ्या द्वाव्या लागतात आणि निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
Uddhav Thackeray: राज ठाकरेंना फोन अन् मुंबई महानगरपालिकेचं गणित; दोन्ही बंधूंचं ठरलं? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
अजित दादा, शिंदे आणि फडणवीसांची काय परिहार्यता असेल- अंधारे
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो. विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात. लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असं मला वाटतं मात्र, ही चर्चा होण्या ऐवजी मंत्रिमहोदय ऑनलाइन गेम खेळत असतील तर गंभीर आहे. अजित दादा, शिंदे आणि फडणवीसांची काय परिहार्यता असेल बर ज्यामुळे अशा लोकांना उमेदवाऱ्या द्वाव्या लागतात आणि निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

