Solapur News: सोलापुरात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे एका कार्यक्रमात काळं फासण्यात आलं. शिवधर्म फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत हे कृत्य केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटमध्ये श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने गायकवाड यांचा सत्कार आयोजित केला होता. तिथेच शिवधर्म फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. यामुळे एकच गोंधळ उडाला.
शिवधर्म फौंडेशन आणि शिवभक्तांचा आरोप आहे की, प्रवीण गायकवाड यांनी स्वामी समर्थांविषयी अपशब्द वापरले. तसंच संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. त्यामुळे शिवभक्त संतप्त झाले होते. या घटनेनंतर शिवधर्म फौंडेशनने संभाजी ब्रिगेडला इशारा दिला आहे. राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. “जर संभाजी ब्रिगेडने आपल्या संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबवला नाही, तर त्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रभागी असणारे दोन्ही भाऊ कायम सोबत राहणार? बड्या नेत्याची महत्त्वाची प्रतिक्रिया
अक्कलकोटमध्ये नक्की काय घडलं?
गायकवाड एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. हे कृत्य करणारे शिवधर्म फौंडेशनचे कार्यकर्ते होते, अशी माहिती आहे. सदर कार्यकर्त्यांनी या घटनेनंतर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “स्वामी समर्थांच्या भूमीतच संभाजी ब्रिगेड अध्यक्षाचा काळं फासून केलेला निषेध म्हणजेच स्वामींचा दिव्य न्याय आहे.”

