Ujjwal Nikam News : ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे. त्यांच्यासोबत सी. सदानंदन मस्ते, हर्षवर्धन श्रृंगला आणि मीनाक्षी जैन यांचीही नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर निकम यांचे खासदार बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम म्हणाले की, आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या माझ्या पाठिशी राहतील. आपल्याला समाज उपयोगी काम करायचे आहे. हा देश हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एकसंघ कसा आहे, हे दाखवायचे आहे. त्यासाठी मला सर्वांच्या शुभेच्छा लागतील. मी लोकसभेच्या निवडणुकी पुरता त्यामध्ये होतो, आपल्याला कल्पना असेल की, लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्दावर लढली गेली.
मोठी बातमी! उज्ज्वल निकम होणार राज्यसभेचे खासदार, ‘या’ चार जणांच्या नावाची घोषणाजिथे गैरसमजूती पसरवल्या गेल्या, जिथे गैरसमजूतींना लोक बळी पडले, ज्यावेळी याचा परिणाम लोकांना दिसला की, आपलं चुकलं. विशेष: कसाबच्या गोळीने आमच्या या राज्यातील शहिदांची हत्या झालेली नाही असं सांगण्यापुरते देखील काही राजकिय नेत्यांची मजल गेली होती. हे बघितल्यानंतर लक्षात आलं की, गोबेल्स प्रपोजेंटा हा काय असतो हे मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाले. परंतू गोबेल्स प्रपोजेंटा उघडा पाडत जनतेने विधानसभेत दाखवून दिले.
मुंबई महापालिकेच्या ‘अँथनी’ला भेटणार, मिहिर कोटेचा यांच्या आरोपांना उदय सामंतांचं उत्तर
पुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, आमची जनता ही स्वाक्षर आहे हे काही राजकीय शक्ती विसरतात आणि त्यांनी तसे विसरू नये. राज्यसभेवर निवड झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उज्वल निकम यांचे नाव 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर गाजले आहे. या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच त्यांनी काही महत्वाच्या केस देखील लढवल्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही ते सरकारी वकील म्हणून काम पाहात आहेत.

