Madhu Chavan Slams Uddhav Thackeray : रत्नागिरीत भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “2009 मध्ये प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी केलेला फोन उद्धव ठाकरे त्यांना देत नसत. सूर्याच्या पोटी जन्माला आलेला तो काजवा आहे, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 2014 मध्ये युती होणार नाही हे प्रमोद महाजन यांनी 2009 मध्येच ठरवले होते”, असंही मधू चव्हाण म्हणाले आहेत.
“प्रमोद महाजन हा आमच्यातली एक हिरा होता. द्रष्टा नेता होता. ज्या वेळेला वसंतराव भागवत यांनी त्यांची राज्यसभेवर निवड केली आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं मी एकदा प्रमोदजीना म्हणालो की, तुम्ही भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व्हावं, अशी आमची इच्छा आहे. चार पावलं ते पुढे गेले आणि मागे आले आणि म्हणाले काय म्हणालास हे तुझे हे स्वप्न ठीक आहे. पण माझं स्वप्न त्याच्याही पेक्षा मोठं आहे. या देशाचं पंतप्रधान व्हावं ही एक इच्छा आहे. आपला देश वैभवशाली आहे. माझ्या देशाचा रुपया हा डॉलरप्रमाणे जगामध्ये सर्वमान्य होईल असेही प्रमोद महाजन म्हणाले होते. हे त्यांचे स्वप्न होतं”, अशी आठवण मधू चव्हाण यांनी सांगितली.
आज प्रमोद महाजन असते तर राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेला असती? तुमचं मत काय? असं विचारता ते म्हणाले की, “त्यांचे आणि आमचे सगळ्यांच्या विचारांमध्ये फरक पडला नसता. आम्ही सगळे एकाच विचारायचे आहोत. फक्त त्यांच्या अंमलबजावणीच्या कृतीमध्ये फरक पडला असता. पण आत्ताची राजकीय परिस्थिती आहे ती अनिवार्यच होती. ही परिस्थिती प्रमोद महाजन असतानाही आली असती. कारण युती 2014 साली होणार नाही हे 2009 सालीच प्रमोद महाजन यांनी निश्चित केलं होतं”.
भाजप नेते मधू चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
भाजपचे जेष्ठ नेते विधान परिषदेचे दिवंगत माजी आमदार प्रमोद महाजन यांचे निकटवर्ती असलेले, त्यांच्याबरोबर काम केलेले मधू चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “2009 सालीच प्रमोद महाजन तेव्हाच म्हणाले होते की, मधू 2014 मध्ये आपण स्वतंत्र लढू, असं भाकित त्यांनी तेव्हाच सांगितलं होत. त्यामुळे हे घडणारच होतं. हे निश्चित होतं आणि या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत”, याचाही पुनरुच्चार मधू चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे भाजपाचे जुने आणि जाणते ज्येष्ठ असलेले मधू चव्हाण यांच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

