Nashik 10th Class Student Dies By Heart Attack: नाशकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 10वीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला आहे. घरी व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
नाशिकच्या चांदवडमध्ये एका मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रवीण धायगुडे (वय वर्ष 15) असे मृत मुलाचे नाव असून, तो इयत्ता दहावीत शिकत होता. नेहमीप्रमाणे तो घरी व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला. जोरात आवाज आल्याने, काय झालं म्हणून आईने धाव घेतली. तेव्हा त्यांना प्रविण कोसळलेला दिसला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. डॉक्टरांनी प्रवीणला तपासून मृत घोषित केले.
Heart Attack In Gym: वजन कमी करण्याच्या नादात जीव गेला; व्यायाम करताना हार्ट अटॅक अन् 10 मिनिटांत होत्याचं नव्हतं
प्रवीणच्या मृत्यूने धायगुडे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
170 किलो वजन कमी करण्याच्या नादात जीव गेला
अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. जिथे वजन कमी करण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. हा तरुण जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचं नाव पंकज शर्मा असून तो 37 वर्षांचा होता. सकाळी जिममध्ये गेल्यावर पंकजने ब्लॅक कॉफी प्यायली आणि नंतर खांद्यावर पुल-अप व्यायाम सुरू केला. तिसऱ्यांदा पुल-अप करण्याचा प्रयत्न करताच तो अचानक कोसळला. तेव्हा जिममधील इतर सर्व धावून आले आणि त्याला सीपीआरही देण्यात आला. मात्र, त्याला वाचवण्यात यश आलं नाही.
