Kannad Building Collapse : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात एक मोठी दुर्घटना टळली. कन्नड नगरपालिकेची जुनी इमारत तहसील कार्यालयासमोर पत्त्यासारखी कोसळली. सुदैवाने दुकाने बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीचा भाग कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली, नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी धाव घेतली. इमारत कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असा आहे.
कन्नड तहसील कार्यालयाचं कामकाज आज नेहमीप्रमाणे सुरु होतं. या दरम्यान आज दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या अगदी समोर असलेली जुनी इमारत कोसळली . इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही इमारत कन्नड नगरपालिकेची होती. इमारतीच्या खाली दुकानं आहेत. इमारतीच्या तळमजल्याला अनेक गाळे आहेत. सुदैवाने इमारतीचा जो भाग खाली कोसळला त्या परिसरातील दुकानीच गाळे बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इमारत कोसळत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. इमारतीचा काही भाग पत्त्यांसारखा जमिनीवर कोसळतो. त्यामुळे परिसरात मोठी धूळ निर्माण होते. ही धूळ बाजूला झाल्यानंतर समोर पडलेली इमारत दिसते. यावेळी पोलीस आजूबाजूच्या दुकानात असलेल्या लोकांना बाहेर काढतात. अचानक अशाप्रकारची घटना घडल्यामुळे नागरीकदेखील भयभीत होतात. नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याचं काम करण्यात आलं. या दरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली.
कन्नड शहरातील तहसील कार्यालयासमोरील नगरपालिकेची इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. #KannadaNews pic.twitter.com/K72KTpGfBe
— Maharashtra Times (@mataonline) July 3, 2025
या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत घटनेचा थरार अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. सुदैवाने इमारत कोसळली त्या भागाची दुकानं बंद होती. पण त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही लोकं होतं. घटना घडत असताना पहिल्या मजल्यावरच्या काही जणांनी तातडीने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यामुळे ती बचावली. संबंधित इमारत धोकादायक होती का? आणि असेल तर मग तिथे दुकानं कशी सुरु होती? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

